Skip to main content

पालकत्वाच्या वाटा

👶🏻👴🏻👨🏻‍💻🤷🏻‍♀🙋🏼‍♀👨‍👨‍👧

*पालकत्वाच्या वाटा*

- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो.
माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.

निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का?  मुले कोणत्या वयात लाजतात?  कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही.

आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आपल्याला माहिती असतं?  आणि आठवलं तरी आता जुने दिवस कुठं उरलेत ? आता कुटुंब विभक्त झालीत. कुटुंबापासून  एकटी पडलीत .काहींना एकटे राहण्यात आनंद मिळतोय. एकदंरीत कुटुंबाचे स्वरूप आता बदललेले आहे.
 पूर्वी घरातील आजी -आजोबा ,आई -वडील मुलांसाठी जितका वेळ द्यायची तितका आज मुलांसाठी वेळ दिला जात नाही त्यामुळे पाळणाघरे, बालसंस्कार अशा संकल्पना उदयास आल्या.
लहानपणी मुलांसाठी वेळ दिलाच पाहिजे पाहिजे कारण लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ हा बाल्याच्या विकासाची पायाभरणी आहे ,हे प्रत्यक्ष समजून घ्यायला हवे.
पूर्वी अंगाईगीते, बडबडगीते ही आईच्या आवाजातील असायची त्याची जागा आज मोबाईलातील बाईने घेतलीय. आईच्या आवाजातील संगीतविरहित अंगाईगीते ही मोबाईलमधील बाईच्या संगातासह गायलेल्या अंगाईपेक्षा शंभर पटीने भारीय. आईच्या अंगाईत आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आहे ततसा मोबाईलच्या अंगाई गीतात कुठंय?बालकांच्या आई वडील किंवा घरातील इतरांचा होणारा स्पर्श आणि अावाज यातून सुरक्षिततेची भावना येत असते .त्यामुळे साधे गायनही   बाळांना झोपी लावते. मोबाईलमध्ये अंगाईत लावून तासन् तास झोका द्यायची गरज उरत नाही. म्हणून पालकांनी किमान दोन -तीन अंगाईगीते पाठ करुन ठेवायला काय हरकत आहे ?
आत्ताच्या पालकांना प्रत्येक गोष्टी घाई झालीय.माझे बाळाचा विकास झपाट्याने व्हावा, माझे मूल इतरांपेक्षा हुशार व्हावे यासाठी रस्सीखेच सुरु असल्यासारखे वागतात. त्यासाठी बाजारातून कोणकोणत्या प्रकारचे साहित्य खरेदी करतात हे त्यांनाच माहिती. खरंतर बालकांची वाढ हा पूर्णतः निसर्गिक बाब आहे .बालकांच्या मानसिक, भावनिक विकासाच्यादृष्टीने मात्र आपल्याला प्रयत्न करतात येतात. बालकांच्या विकासाला पोषक वातावरण तयार करणे ,प्रसंग तयार करणे हे मात्र पालकाच्या हाती असते .
मुलांचा आहार,झोप,विश्रांती याकडे पालक कटाक्षाने लक्ष देत असतात तसेच लक्ष वयानुसार त्यांच्या गरजा, अपेक्षा, हालचाली, स्वभाव बदल, अडचणी याकडे पण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
मूल लहान असो वा मोठे त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे .मुलांच्या गरजा आणि  भावना यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो.मुलांच्या गरजा लक्षात आल्या की त्यांच्या वागण्यातील बदल लक्षात येतो त्यातूनच मुलांच्या भावना समजतात. मुलांच्या भावना,अपेक्षा, गरजा समजल्या की त्याच्या विकासासाठी काय करता येईल हे लक्षात येते तेव्हा बाल्याच्या विकासाचा निम्मा टप्पा आपण ओलांडलेला असतो. यातून मुलांसोबत कसे बोलावे, काय बोलावे, कोणते प्रसंग तयार करावेत, कोणत्या अडचणी आहेत,कोणते खेळ खेळावेत ,कोणते अनुभव सांगावेत अशा अनेक गोष्टीबाबत समजल्याने पालकांनाही दिशा मिळून जाते.
धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांन...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...