Skip to main content

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची
व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते.
विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते.
कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला वाटते. यासाठी शिक्षण म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय?  विद्यार्थी विकास म्हणजे काय?  या बाबी पालक , शिक्षक व समाज यांनी समजून घ्यायला पाहिजे. विद्यार्थी विकासात पालक, समाज व शिक्षक यांनी स्वतंत्र नाही तर एकत्र राहिले तर विद्यार्थी विकास साधणे सोपे जाते कारण मूल घडविण्याची जबाबदारी या सर्वांची आहे.
- ज्ञानदेव नवसरे

Comments

Popular posts from this blog

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांन...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...