Skip to main content

Posts

Showing posts from October, 2018

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते त्यामुळे आम्हाला काय बी भ्याव नाय.

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांना देऊ शके

अनुभवलेली लोकं

*मी अनुभवलेली लोकं* 📝 *ज्ञानदेव नवसरे* #Status ला *@बालसेवा देशविकासासाठी* लिहितात आणि *बालकांसाठी झटणा-यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. # Status ला *@नाते_ऋणानुबंधाचे* लिहितात आणि *मैत्री करताना जात पाहतात* ही उलटदर्शी लोकं घातकच. #Statusला *समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानतात* आणि जो *समाजासाठी झगडतोय त्यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. अशी *उलटदर्शी लोकं सुलटं काम करणारांनाच त्रास* देतात. #तात्पर्य  *माणसं जोडताना जात ,नातेसंबंध,फुकटची देशभक्ती नाही तर त्याचे इतरांसोबतचे नाते, त्याचे समाजासाठीचे काम आणि देशासाठीचे काम पहावे.* # *तुम्ही देशभक्त आहात  तुम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही.* धन्यवाद🙏🏻

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनाने रा

आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग

*#आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग* जून महिन्याचे सुरुवातीचे शाळेचे दिवस होते. इयत्ता पहिलीत नव्याने मुले दाखल होत होते. शाळेचे वातावरण त्यांच्यासाठी अनोळखी होते. काही मुले सभाधीटपणे बोलत तर काही मुले लाजरीबुजरी आणि घाबरलेली असायची. तीन दिवस साईची आई त्याला घेऊन सुरूवातीला बसली तरीही साई शाळेत बसल्यावर रडत असायचा. काही दिवसानं माझ्यावर त्याचा विश्वास बसल्यावर रडायचा थांबला. साईबद्दल नंतर स्वतंत्र निश्चितपणे लिहिणार आहे. यश हा एकांगी राहणारा आणि अतिशय घाबरट होता. मी वर्गाच्या बाहेर गेलो की बँंचखाली लपून बसायचा. मी विचारायचो,  "यश कुठे गेला?" मुले सांगायची, "बँंचखाली लपलाय" . मी जवळ जाऊन त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तर रडायचा म्हणून मी त्याला जास्त बळजबरी कधीही केली नाही. तो तसाच बँचखाली लपून बसायचा.  चाॅकलेट आणल्यात ,मोबाईलवर कार्टुनस् लावल्यात म्हटल्यावर हळूच वर बसायचा तरी माझ्या जवळ यायचा नाही. एके दिवशी दोनच मुले पहिलीची आली होती. दोघंजण एका रॅम्पवर घसरगुंडी करत होते.मी दोघांच्या जवळ गेलो .मोबाईलवर कार्टुनस् लावल्या. शाळेचे सुरुवातीचे चार पाच दि

मुलांना समजून घेताना घाई कशाला?

# *मुलांना समजून घेताना घाई कशाला?* रविवारचा दिवस होता. माझा Laptop ची बॅटरी प्रोबलेम आणि इतर updated software घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या लॅपीचे काम होईपर्यंत मी खुर्चीत बसलेलो होतो. तिथे आलेल्या काही जणांसोबत शिक्षण ,विद्यार्थी ,शाळा यावर गप्पा सुरु होत्या. त्यातील एक प्रसंग लिहावा वाटला.  एकजण बोलत होते माझ्या वर्गातील काही मुले अजिबात बोलत नाहीत.एकदम शांत बसून घेतात.आपण पन्नास वाक्य बोलावी तेव्हा ते एक वाक्य बोलतात बाकी ढिम्म बघत बसतात. ते विद्यार्थी बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव कसा कळेल? त्याच्या मनात काय चाललेय, हे कसं कळेल?आणि मला कळल्याशिवाय मी त्यांना काय सांगू?  ते एकदम शांत बसतात म्हणजे ते ढिम्म आहेत ,म्हणजे ते ढ आहे त्यांची बुद्दीची चालत नाही असे त्यांचे मत येत होते.  खरतर वास्तवात तसे नसतेही. कारण स्वभाव आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजलं जातं . अनेकदा आपण तक्रार करत असतो की अमुक्याचा स्वभाव असा आहे ,त्याला मी काय करणार?  त्याची बुद्धिमत्ता कमी आहे त्याला मी काय करणार.परंतु स्वभाव आणि बुद्धिमत्ता यांना जोडणारी गोष्ट म्हणजे त्याची विचारशैली. आप

उत्साहाचे वातावरण आणि आपण

*#उत्साहाचे वातावरण आणि आपण* सध्या आजूबाजूला पाहिले तर अनेक मुले, शिक्षक,पालक यांच्यात एक तक्रार नेहमी आढळताना दिसते की 'मला बोअर होतेय , मला कंटाळा आलाय ,मी करणार नाही'.   या उत्साहाच्या बाबतीत घडलेला मला एक प्रसंग आठवतोय.गेल्या आठवड्यात नवरात्रानिमित्त येवल्यात नऊ दिवस कोटमगावच्या देवीची मोठी यात्रा असते त्या दरम्यान एका दिवशी विद्यार्थी उपस्थिती  ब-यापैकी कमी होती. मुख्याध्यापक सर आणि मी विद्यार्थ्यांच्यासोबत जेवण करत होतो. आमच्या जेवताना गप्पा सुरु असतात.  एका सहावीचा मुलगा म्हणाला,"आज मला लयी बोअर होतेय" . मी म्हणालो, "बोअर होणे म्हणजे काय?" "अहो सर, म्हणजे मला करमत नाही,खेळू वाटत नाही,अभ्यास करु वाटत नाही" . जवळचे  घडवणारे, खेळवणारे आणि मदत करणारे त्याचे  मित्र आज शाळेत आले नव्हते त्यामुळे त्याला तसे वाटत होते.  खरतर मुलांची उपस्थिती हवी तितकी नसेल तर केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांमधील उत्साह पण मावळतो .डोके चक्रावल्यासारखे होते. मुलांच्यामध्ये उत्साह नसेल तर शिक्षकांमध्ये त्यांना शिकवायला ,त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडून उपक्र

भूमिका बदलाचा खेळ

*# भूमिका बदलाचा खेळ* संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा थोपण्याआधी शंभूबाळासोबत अर्धा-एक तास खेळ चालू असतोच. ब्लाॅक्स,चित्रांचा खेळ ,गाड्या वगैरे खेळणीसोबत खेळ तर चालूच असतात.  शंभू चा प्रतिसाद घेण्यासाठी भूमिका बदलाचा खेळ हा माझा त्याच्यासोबतचा आवडता खेळ आलेला आहे.  यामध्ये शंभु अनेक भूमिका घेत असतो. कधी भेळवाला ,कधी भाजीवाला ,कधी डाॅक्टर तर कधी माझी आई होत असतो. शंभुची माझ्या आईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी  आनंदाचा तितकाच मजेचा खेळ असतो. मला पुन्हा लहानपण जगता येते.यामुळे मला फायदाही होत असतो. आईच्या किंवा इतर भूमिकेत बाळ जेव्हा बोलत असते तेव्हा त्याचीच विचारशैली विकसित होत असते.गमतीत खेळत असलेला खेळ माझ्या अनेक समस्यांना उत्तर देत असतो. खरतर संस्कार घडताना अशा गमतीदार मार्गांचा उपयोग फायद्याचा ठरतो कारण अशा प्रसंगातून संस्कार घडले जातात ते लादले जात नाहीत.आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी चांगलं वागावं. एका अंगाने विचार न करता वेगळा विचार करावा .  यासाठी अापल्याही यातून जावे लागते . म्हणून याला मुलांचा संस्कार विकास, बुद्धीचा विकास म्हणजे पालकाचा विकास असेही म्हणता येते. आ