Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

पालकत्वाच्या वाटा

👶🏻👴🏻👨🏻‍💻🤷🏻‍♀🙋🏼‍♀👨‍👨‍👧 *पालकत्वाच्या वाटा* - *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो. माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का?  मुले कोणत्या वयात लाजतात?  कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही. आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आपल