Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल्पनांची वाढ होऊ देतेय का ? खर तर