Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा, पतंगाची भरारी , उंचीची चढाओढ, पतंग काटणे ,पतंगोत्सव करताना गीत अशा अनेक बाबी शंभूच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होत्या. आठ -दहा दिवसांपासून त्याच्या पतंगाच्या बाबी स

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡                      🖋 *ज्ञानदेव नवसरे*            www.Shikshanvichar.blogspot.in           मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.             अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.           अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री खेचून आणली. माझ्या लक्षात आले की दोन्हीकडं सारख्याच ताकदीचे तुल्यबल खेळाडू असायला हवेत म्हणून थोडा बदल करत सचिनच्या गटातील दोघांची अदलाबदली केली. आता सामन्यात आणखी रंगत

निर्णयांची कसरत

😇☺ 🙆🏻  *निर्णयांची कसरत ...* 🙆🏻‍♂😊😇           🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in              जया प्रथमच गाव सोडून बाहेर गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट   सीमासोबतच करायची.         पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.            आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला खुश करण्यासाठी नव-याच्या आवडीने स्वयंपाक करायचा ,त्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या आणायच्या आणि नवरा म्हणेल तीच भाजी करायची असं

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता नाशिकमध्ये पोहचली. @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩   यांचे मणक्याचे Operation

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु