Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला वाट