Skip to main content

भूमिका बदलाचा खेळ

*# भूमिका बदलाचा खेळ*

संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा थोपण्याआधी शंभूबाळासोबत अर्धा-एक तास खेळ चालू असतोच. ब्लाॅक्स,चित्रांचा खेळ ,गाड्या वगैरे खेळणीसोबत खेळ तर चालूच असतात.  शंभू चा प्रतिसाद घेण्यासाठी भूमिका बदलाचा खेळ हा माझा त्याच्यासोबतचा आवडता खेळ आलेला आहे. 
यामध्ये शंभु अनेक भूमिका घेत असतो. कधी भेळवाला ,कधी भाजीवाला ,कधी डाॅक्टर तर कधी माझी आई होत असतो.
शंभुची माझ्या आईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी  आनंदाचा तितकाच मजेचा खेळ असतो. मला पुन्हा लहानपण जगता येते.यामुळे मला फायदाही होत असतो. आईच्या किंवा इतर भूमिकेत बाळ जेव्हा बोलत असते तेव्हा त्याचीच विचारशैली विकसित होत असते.गमतीत खेळत असलेला खेळ माझ्या अनेक समस्यांना उत्तर देत असतो. खरतर संस्कार घडताना अशा गमतीदार मार्गांचा उपयोग फायद्याचा ठरतो कारण अशा प्रसंगातून संस्कार घडले जातात ते लादले जात नाहीत.आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी चांगलं वागावं. एका अंगाने विचार न करता वेगळा विचार करावा . 
यासाठी अापल्याही यातून जावे लागते . म्हणून याला मुलांचा संस्कार विकास, बुद्धीचा विकास म्हणजे पालकाचा विकास असेही म्हणता येते.

आपल्या मुलाला हुशार, स्मार्ट, बुद्धिमान, संस्कारित बनवायचे असेल तर सुरुवात स्वतः पासून करावी लागेल.आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो की पाल्य सुद्धा आपोआप त्याच्यासमोर मुलांचा विकास घडताना दिसत असतो.
गेल्या वर्षी काढलेला मी लेकरु अन शंभु आई चा व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो.  त्यातून आनंद तर होतोच शिवाय लेकराला लेकराचं कौतुक पण वाटते.

ब-याच वेळा अनेकांना नोकरी अन धावपळीच्या जीवनात लेकरांसोबत खेळायला ,बोलायला वेळ मिळत नाही. अशी लेकरं एककल्ली होण्याची भिती असतेच. लहानपणी मुलांसाठी दिलेला वेळ ही मुलांच्या विकासासाठीची पायाभरणी असते. 
धन्यवाद.

*-ज्ञानदेव नवसरे, नाशिक*

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...