# *मुलांना समजून घेताना घाई कशाला?*
रविवारचा दिवस होता. माझा Laptop ची बॅटरी प्रोबलेम आणि इतर updated software घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या लॅपीचे काम होईपर्यंत मी खुर्चीत बसलेलो होतो. तिथे आलेल्या काही जणांसोबत शिक्षण ,विद्यार्थी ,शाळा यावर गप्पा सुरु होत्या. त्यातील एक प्रसंग लिहावा वाटला. एकजण बोलत होते माझ्या वर्गातील काही मुले अजिबात बोलत नाहीत.एकदम शांत बसून घेतात.आपण पन्नास वाक्य बोलावी तेव्हा ते एक वाक्य बोलतात बाकी ढिम्म बघत बसतात. ते विद्यार्थी बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव कसा कळेल? त्याच्या मनात काय चाललेय, हे कसं कळेल?आणि मला कळल्याशिवाय मी त्यांना काय सांगू? ते एकदम शांत बसतात म्हणजे ते ढिम्म आहेत ,म्हणजे ते ढ आहे त्यांची बुद्दीची चालत नाही असे त्यांचे मत येत होते.
खरतर वास्तवात तसे नसतेही. कारण स्वभाव आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजलं जातं . अनेकदा आपण तक्रार करत असतो की अमुक्याचा स्वभाव असा आहे ,त्याला मी काय करणार? त्याची बुद्धिमत्ता कमी आहे त्याला मी काय करणार.परंतु स्वभाव आणि बुद्धिमत्ता यांना जोडणारी गोष्ट म्हणजे त्याची विचारशैली. आपण जेव्हा एखाद्याचा स्वभाव अमुक आहे तमुक आहे असे म्हणतो त्यावेळी त्याची विचारशैली तशी आहे . मुलांच्यावर काय सर्वांच्या विचार करायच्या पद्धतीवर माणसाचा स्वभाव ठरत असतो आणि त्यातून बुद्धिमत्ता प्रकट होत असते. म्हणून मुलांचा स्वभाव समजला की त्याची विचारशैली समजेल आणि वैचारशैली समजली की आपण कोणत्या प्रसंगात त्यांच्याशि कसे वागता येईल ते समजणे सोपे जाईल. ज्यावेळी आपल्याला मुलांचा स्वभाव, वैचारशैली न समजल्यामुळे वरील प्रकारच्या तक्रारी आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.
मूल समजून घेणे ही हवी तितकी गोष्ट सोपी नाहीच आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करुन त्यादृष्टीने पाऊल उचलत जायला हवे. एखाद्याच्या स्वभावावरुन विचारशैली समजून घेऊयात आणि मग त्याची बुद्धिमत्ता ठरवूयात.
एखाद्याची विचारशैली समजून न घेता त्याच्या बुद्धीमत्तेसंबंधी काढलेला निष्कर्ष घाईचा होईल असे मला वाटते.
- *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*

Comments
Post a Comment