*#उत्साहाचे वातावरण आणि आपण*
सध्या आजूबाजूला पाहिले तर अनेक मुले, शिक्षक,पालक यांच्यात एक तक्रार नेहमी आढळताना दिसते की 'मला बोअर होतेय , मला कंटाळा आलाय ,मी करणार नाही'.
या उत्साहाच्या बाबतीत घडलेला मला एक प्रसंग आठवतोय.गेल्या आठवड्यात नवरात्रानिमित्त येवल्यात नऊ दिवस कोटमगावच्या देवीची मोठी यात्रा असते त्या दरम्यान एका दिवशी विद्यार्थी उपस्थिती ब-यापैकी कमी होती. मुख्याध्यापक सर आणि मी विद्यार्थ्यांच्यासोबत जेवण करत होतो. आमच्या जेवताना गप्पा सुरु असतात. एका सहावीचा मुलगा म्हणाला,"आज मला लयी बोअर होतेय" .
मी म्हणालो, "बोअर होणे म्हणजे काय?"
"अहो सर, म्हणजे मला करमत नाही,खेळू वाटत नाही,अभ्यास करु वाटत नाही" .
जवळचे घडवणारे, खेळवणारे आणि मदत करणारे त्याचे मित्र आज शाळेत आले नव्हते त्यामुळे त्याला तसे वाटत होते.
खरतर मुलांची उपस्थिती हवी तितकी नसेल तर केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांमधील उत्साह पण मावळतो .डोके चक्रावल्यासारखे होते. मुलांच्यामध्ये उत्साह नसेल तर शिक्षकांमध्ये त्यांना शिकवायला ,त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडून उपक्रमात सहभागी करुन घ्यायला पण उत्साह राहत नाही.
याउलट ज्या मुलांमध्ये उत्साह दिसतो ती मुले लगेच ओळखू येतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसते,चेह-यावर तेज दिसते अगदी कुठेही अशी मुले ओळखायला येतात , अशा मुलांसोबत काम करायला आनंद वाटतो.
अलीकडे विविध कामांच्या ताणाने उत्साह कमी होण्याची भिती दिसतेच आहे.
शिक्षक ,विद्यार्थी किंवा पालक यांच्यातील उत्साह का हरवतोय ? हा महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय.
एक तर प्रचंड शारीरिक ताण.
खाजगी शाळेतील लेकरांना तर प्रचंड वेळानंतर स्कूलबसने होणारा प्रवास, पुन्हा शाळा ,शिकवण्या ,त्या शिकवण्याला जायचा प्रवास आणि आणखी इतर गोष्टीत मुले थकून जात आहेत त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत नाहीत.
शिक्षकांमध्येही अतिरिक्त कामाचा बोजा,अशैक्षणिक कामे, गोंधळून सोडणारे शासन निर्णय यामुळे शिक्षकांमधील कामाचा उत्साह मावळत आहे की काय अशी भिती मनात येते.
यामुळे शिक्षक अन विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अनेकदा उत्साही बनत नाहीत.
प्रत्येकाच्या जीवनात हास्य विनोद आणि खेळ यांचा समावेश असायला हवा.
मुलांना आणि आपल्याला उत्साही राहयचं असेल तर आपण आनंदी राहायला हवं.
आनंदी असणं खरं तर घरातील वातावरणावर , आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर खुप अवलंबून असते.
खरतर काही कारण नसताना वैतागलेले अनेक लोकं सध्या दिसतात कारण ते आनंदी राहू शकत नाहीत त्यामुळे उत्साह सुद्धा दाखवू शकत नाहीत.
विनाकारण दुखी राहण्यापेक्षा अापल्या घरात हास्य, थट्टा मस्करी चे वातावरण असेल ,विनोदाचे वातावरण असेल तर आपोआप घरामध्ये उत्साह निर्माण व्हायला मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावारण असण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पालकांसोबतही चर्चा करायला हरकत नाही. लहान वयात मुलांसाठी दिलेला वेळ ही त्याची उत्कृष्ट पायाभरणी आहे हे पालकांना समजून सांगायला हवे. आपल्या मुलांना उत्साही बनवायचे असेल तर आपल्यातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनवायला हवे आहे .
- ज्ञानदेव नवसरे, नाशिक

Comments
Post a Comment