Skip to main content

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास

आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो.
एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता.
अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात.
मुलांसोबत मनाने राहिलो की मूल आपल्या मनाला समजून घेते .आपल्याला समजून घेतल्यावर मूल समजून घ्यायला सोपेच जाते.
-ज्ञानदेव नवसरे, नाशिक

Comments

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...