Skip to main content

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*
                 - ज्ञानदेव नवसरे
           
           आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.
                   महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो.
पतंग ,रीळ, मांजा, पतंगाची भरारी , उंचीची चढाओढ, पतंग काटणे ,पतंगोत्सव करताना गीत अशा अनेक बाबी शंभूच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होत्या. आठ -दहा दिवसांपासून त्याच्या पतंगाच्या बाबी सुरु होत्याच.  पतंगोत्सवाचा खरा दिवस म्हणजे संक्रात .संक्रातीला शाळेला सुट्टी म्हणून दिगांबर यादव सर सहपरिवार पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत.
          आज दादूच्या येवल्यातल्या अनुपस्थितीने पतंगाची भरारी शंभूला दिसत नाहीये. सकाळी गॅलरीत उभा शंभू आकाशातील पतंगाची रंगबेरंगी पंगत पाहून आल्यावर माझ्याजवळ पतंगाच्या गप्पांचा रट्टा सुरु केला.
            आठेक दिवसांपूर्वी त्याने मला पतंग मागितली होती पण पतंगोत्सवाला वेळ होता त्यामुळे मी त्याची समजूत काढली होती.
आज वेळ आली होती पतंगोत्सवाची .गावातून पतंग आणली . पतंगाला मंगळसूत्र बांधले. खरंतर लहान पणी पतंगाचा खुप अनुभव घेतलेला आहे पण मंगळसूत्र बांधताना माझ्याकडून गफलत झालीच . त्याच्यातील मापांचे गणित हुकले होते.
             पतंग आणि दोरा घेऊन शंभू अन मी छतावर गेलो.
शंभू आत्मविश्वासाने बोलत होता. त्याला खुप आनंद झाला होता ."आप्पा माझ्याकडे द्या, मी पतंग उडवणार आहे .मला पतंग करता येते." हातांच्या पतंग उडविण्याच्या कृती करत दोरा खेचायचा कसा ते सांगत होता. पतंग कशी हवेत उडवायची ते सांगत होता.दोरा अन मांजातील फरक सांगत होता.पतंग उडविताना काय काय करायचे?  सगळ्या कहाण्या शंभूच्या तोंडातून अापसूकच येत होत्या.
पतंगाबद्दल तुला कसंकाय माहिती म्हटल्यावर मला सगळं माहिती आहे हे त्याचे उत्तर. पतंगाचे मंगळसूत्र चुकले होते अन वाराही कमीच त्यामुळे पतंग झेप घ्यायला तयार होत नव्हता.
"अहो आप्पा माझ्याकडे द्या ना. मी पतंग उडवितो", त्याचे रहाटगाणे सुरूच होते. दोरा अन पतंग शंभूच्या जवळ देऊन टाकली.  पतंग उडवितानाचा भरपूर कसरत सुरु होती. परंतु पतंग हवेत झेप घेत नव्हताच . त्याचे प्रयत्न सुरूच होते. तोपर्यंत शेजारच्या अरूणला बोलावून दुस-या पतंगाला बरोबर मंगळसूत्र बनवून घेतले. आता वा-याचा वेग काहीसा वाढला होता.शंभूच्या हातात नवीन पतंग दिली आणि अरुणच्या मदतीने  पतंग उडविलीही.  मला तर खुप कौतुक लागले. पतंग हवेत उडतेय. ती माझी पतंग आहे याचा आनंद शंभूचे अनुभवविश्व वाढवित होता.
खरंतर तर आम्ही पतंग घेऊन जात असतानाचा त्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याच्या आजूबाजूला घडणा-या घटना आणि कृती यांच्यातून आला होता.
            आत्मविश्वास आपल्याला जीवन जगायला शिकवितो हा त्यातीलच एक प्रकार.म्हणूनच म्हणतात ना, आत्मविश्वास ही एक शक्ती आहे ती पर्वतालाही हलवू शकते.

धन्यवाद 🙏🏻

Comments

  1. Supper series of taking an account of diversions in human mind

    ReplyDelete
  2. खुप छान शब्दांचा वापर करून मांडायला सुरुवात केली....शेवटही अगदी योग्य वेळी केला

    ReplyDelete
  3. खूप छान लेखन !💐

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. माऊली....
    काही साध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच गोष्टी आपण मुलांकडून शिकतो. शंभूचे निश्चिंत कौतुक वाटलं.
    शब्दांकन छानच....



    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...