Skip to main content

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर

            - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव 

               सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम. 

         शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची  मामींना जणू जिज्ञासाच  असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत असतात. मामींना फळा वाचनाची चांगलीच आवड तयार झालेली आहे.  

आज कवायत झाल्यानंतर नम्रता मॅडम, जाधव सर  यांनी सामान्यज्ञान चाचणीसाठी विद्यार्थी रांगेत आणि अंतरावर विद्यार्थी बसवले , पेपरचे वाटप केले. विद्यार्थी परिक्षा देण्यात गढून गेले होते. मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर मुलांचे पर्यवेक्षण करत होते. काही मुलांचे पेपर पूर्ण लिहूनही  झाले होते. त्यांनी पेपर जमा केले. बाकीच्या मुलांचे पेपर सोडवून होईपर्यंत जाधव सर, मी आणि नम्रता मॅडम पेपर चेक करत होतो. 

             दररोजचे प्रश्न वाचन करणाऱ्या मामींना प्रश्नपत्रिका जाणून घेण्यासाठी आमच्या जवळ आलेल्या होत्या. प्रश्नपत्रिका वाचन करत होत्या. आम्ही मामींना सहज शब्द टाकला मामी सोडवता का पेपर ? शिल्लक पेपर मामींना दिला. मामींनी दहा -पंधरा मिनिटात २५ गुणांचा पेपर सोडवून पुन्हा आमच्या जवळ हजर. "सर , तपासा माझा पेपर " पेपर जमा करून पुन्हा त्या आपल्या कामाला लागल्या. मुलांचे पेपर बाजूला करून मामींचा पेपर जाधव सरांनी तपासला , त्यांनी १२ प्रश्न अगदी अचूक सोडवले होते. मामींनी ना वहीत लिहिलेले ना परिक्षा आहे म्हणून प्रश्नांची उजळणी सराव केलेला तरीही इतके चांगले गुण  मिळवणे म्हणजे आमच्यासाठी नवलच  होते. 

खरोखरच मामींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मामींना वाचनाची भारी आवड आहे.घरच्या बिकट आणि कठीण परिस्थितीमुळे मामींना दहावी पर्यंतच शिक्षण घेता आले.शिक्षण जरी सुटले तरी माणूस शिकायचा थांबत नाही हे त्यांनी दाखवून दिले . 

          शाळेत सुरू असलेले उपक्रम, कार्यक्रम, कृती परिसरातील घटकांवरही परिणाम करत असते याचे हे एक उदाहरण आहे . मुलांना शिकण्याचे वातावरण तयार झाल्यावर मुले आपोआप शिकतात याचेही एक उदाहरण.मामींमुळे आपल्या जाणून घेता येईल की शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल , प्रसंगाबद्दल  शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास शिक्मषणामुळेमदत होत असते . शिक्षण आयुष्याला दिशा देते , संतुलन ठेवते. अशा शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आमच्या मामींचे खुप कौतुक. आमच्या शाळेतील शैक्षणिक अनुभवांचा परिसरात घडणाऱ्या बदलांचा अनुभव आमच्यासाठी समाधानाचा आहे. 

धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनाने रा

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमपाड्यातील लोकांकडून शिकावं .        ब-याच दिवसानंतर आमचा गुरुजी दिसल्यावर डोळ्यात पाणी आणून माझे पाय पकडू पाहणाऱ्या आमच्या भोये आजी , म