Skip to main content

मुलांना दिशा देऊयात


*मुलांना दिशा देऊयात* 
अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय.
" आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं. 
शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁
माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो.
ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो. 
"मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता. 
काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस. 
मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गुण असतात ,शक्ती असते पण त्यांना वाव दिला जात नाही. अशा शंभूच्या अनेक गोष्टी असतील की ज्यांना मला अजून समजायच्या आहेत ,त्यासाठी त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि वेळ पाळून राहावीच लागणार आहे कारण मुलांच्या वाढत्या वयासोबत अन बदलत्या आवडीनिवडीसोबत मला जुळवून घ्यावे लागणार आहे.
   *मुलांकडे शक्ती असते पण ती वापरली जात नाही त्या शक्तीला दिशा दिली जात नाही पण दिशा देणं अत्यंत आवश्यक आहे.* मुलांची ही शक्ती कोणती अन कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या शोधता यायला हव्यात. मग त्यावर काम करता येते.
अनेक मुले हायपर असतात ते शांत बसत नाहीत अशा वेळेस आपण त्यांना एक धपाटा मारून शांत करण्याचा प्रयत्न करतो किंवा घराच्या बाहेर घेऊनच जायचे नाही. लहान वयातील बांधलेले गायीचे वासरू एकदा का सोडले की त्याला समजत नाही कुठे धावायचे ,कसे धावायचे ते नुसतं पळत सुटते, उड्या मारते आपण जर घट्ट पकडले नाही तर आपल्याला पण घेऊन जाते त्यामुळे आपण त्याचा दोर सोडून देणं पसंत करतो. 
मुलांची शक्ती समजण्यासाठी मुलांना अगोदर समजून घेणं आवश्यक आहे म्हणून विद्यार्थ्यांना एखादी घटना ,गोष्ट, आशय शिकवायचा असेल तर अगोदर आपण विद्यार्थी व्हायला हवे. त्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी ,भावना आणि त्यांचा हेतू आपल्या लक्षात येतो.
कोणती गोष्ट केल्यावर मुलांना आनंद होतो? काय केले ते मुलांना राग येतो?  कशामुळे मुले नाराज होतायेत?  का नाराज होतात?  त्यांना काय करावे वाटतेय ? त्यासाठी मुलांच्या दुनियेत आपण प्रवेश करायला हवा. हे पालक ,शिक्षक यांच्या लक्षात आले की मुलांसोबत बोलायला, अनुभव तयार करायला अन त्यांच्याशी जुळवून घ्यायला खुप सोपे जाते नंतर मुलांच्या आवडीनिवडी ,भावनांचा विचार करुन प्रसंग तयार करता येतात. त्यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे.
जसे मुलांना समजून घेण्यासाठी मूल बनावे लागते तसे मुलांना वेळ द्यायचा असेल तर मुलांच्या दुनियेत आपल्याला जावे लागते. त्यावेळेस ख-या अर्थाने मुलांच्या विकासाच्या पाऊलवाटेत आपण सोबत असतोय.
https://shikshanvichar.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1
धन्यवाद 🙏🏻

Comments

  1. खुप छान सर आपली निरीक्षण शक्ती वाखाणण्याजोगी आहे

    ReplyDelete
  2. सुंदर विचार

    ReplyDelete
  3. मी आपल्या मताशी सहमत आहे

    ReplyDelete
  4. सर आपण बालकाला ओळखण्यात तरबेज आहात फारच बारकाईने निरिक्षण करता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...