*मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत....*
📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.
सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले.
मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय.
मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले.
गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला दिवा लावते त्यामुळे आम्हाला काय बी भ्याव नाय.मुले बोलतच होती.
मी मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
भूत काय करते?
मुलांची उत्तरे ..
भुत लयी डेंजर असतया.
अंगात शिरते.
अंगात गेल्यावर मारून टाकते.
मी पाहिले होते एकाच्या अंगात भूत घुसले होते.
आमच्या मम्मीची सोन्याची पोत चोरून न्हेली.
पीठ अंगावर ओतून घेते.
माझा पुढचा प्रश्न भूत कसं दिसते?
मुले उत्तरली .
भूत एकदम पांढरे दिसते .
भूत काळे दिसते .
कोणाचे पण रुप घेते.
मुलांना मुक्तपणे व्यक्त होऊ दिले आणि नंतर त्यांना समजावून सांगितले. भूतं वगैरे काही नसतेच. आपल्या मनातील भितीतून घडणा-या गोष्टीला लोकं भूतं म्हणतात.
मुलांना समजावून सांगितल्यानंतर मुलांच्या गप्पा नव्याने सुरु झाल्या. भूत-बीत काय नसतया.ते माणसंच राहत्यात .ते माणसं आपल्याला घाबरवत्या.
खरंतर लहान लेकरं अाजूबाजूला जे
घडतेय ते बारकाईने नोंदवत असतात. बायका घरी बसल्यावर एकमेकांसोबत गप्पा करताना ,आईबापासोबत घरी निवांत वेळेत ब-याच वेळा भुताच्या गोष्टी कुटुंबात चर्चेल्या जातात. लेकरंही सोबत बसलेली असतात. त्यावेळी त्यांच्या सुरु असणाऱ्या गप्पा मुलांना कल्पनेत घेऊन जातात. मुले अशावेळी बोलत नसतात फक्त ऎकत असतात. मनात चित्रांची रचना सुरु असतेच. त्यांच्यात अमुक्याची भांडणं ,तमुक्याला देव पावलाय, अमुक्याला भुताने झपाटलेय म्हणून त्याच्या घरी अमुक घडतयं तमुक घडतेय . अशा गप्पा सुरू असतात. त्यामुळे मुलांना अशा गोष्टी ख-याच वाटतात. पालकांनी कल्पनातील भितीच्या गोष्टी मुलांच्या अवश्य कानावर घालाव्यात पण त्यापासून लेकरु घाबरणार नाही ,त्याच्या मनात उमटलेली प्रतिमा आयुष्यभर राहणार नाही. यासाठी मुलांच्या मनात शिरलेल्या भितीच्या कल्पनात्मक प्रतिमेचे निरसन वेळीच व्हायला हवे. भविष्यात अशी मुले भितीच्या वातावरणात जगतात. त्यांच्यात पुरेसा आत्मविश्वास आढळत नाहीत.
कल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास निश्चितच होतो पण कल्पना कोणती करतोय त्यावरही बरेच अवलंबून असते. नेहमीच भूतांच्या गोष्टी मुलांना भितीच्या कल्पनेच्या घेऊन जातात. वेळीच निरसन झाले नाही तर अशी मुले घाबरट तयार होऊ शकतात.
मुलांना कल्पनेच्या दुनियेत रमायला खुप आवडते पण त्या कल्पना विद्यार्थी विकास करेल अशा असायला हव्यात.
कल्पनेतून अभिव्यक्ती,कल्पनेतून रचना,कल्पनेतून विचार स्वातंत्र्य अशा कित्येक बाबी घडवून आणता येतात.
कल्पनेच्या आनंदी ,दुखी,स्वच्छंदी, सृजनशील ,भितीच्या दुनियेत पालक व शिक्षकांनी जायलाच हवे. मुलांसोबत मनसोक्त गप्पा करायला हव्यात. मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत बरेच काही घडत असते . यातून मूल समजून घ्यायला मदत होते. मुलांच्या अनेक समस्यांना सोडवता येतात आणि विकासाच्यादृष्टीने पुढचे प्रयत्न सुरु करता येतात.
https://shikshanvichar.blogspot.com/2018/10/blog-post_31.html?m=1
धन्यवाद 🙏🏻
📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
![]() |
फोटो सौजन्य : Google |

Very nice dada
ReplyDeleteधन्यवाद ताई
Deleteबालमानसशास्ञाचे अचूक निरीक्षण
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान दादा
ReplyDeleteधन्यवाद
Delete