Skip to main content

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

*मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत....*
📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
फोटो सौजन्य : Google 

            आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.

     सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले.
मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय.

मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले.
गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते त्यामुळे आम्हाला काय बी भ्याव नाय.मुले बोलतच होती.
      मी मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
भूत काय करते?
मुलांची उत्तरे ..
भुत लयी डेंजर असतया.
अंगात शिरते.
अंगात गेल्यावर मारून टाकते.
मी पाहिले होते एकाच्या अंगात भूत घुसले होते.
आमच्या मम्मीची सोन्याची पोत चोरून न्हेली.
पीठ अंगावर ओतून घेते.
      माझा पुढचा प्रश्न भूत कसं दिसते?
मुले उत्तरली .
भूत एकदम पांढरे दिसते .
भूत काळे दिसते .
कोणाचे पण रुप घेते.
            मुलांना मुक्तपणे व्यक्त होऊ दिले आणि नंतर त्यांना समजावून सांगितले. भूतं वगैरे काही नसतेच. आपल्या मनातील भितीतून घडणा-या गोष्टीला लोकं भूतं म्हणतात.
            मुलांना समजावून सांगितल्यानंतर मुलांच्या गप्पा नव्याने सुरु झाल्या. भूत-बीत काय नसतया.ते माणसंच राहत्यात .ते माणसं आपल्याला घाबरवत्या.
        खरंतर लहान लेकरं अाजूबाजूला जे
घडतेय ते बारकाईने नोंदवत असतात. बायका घरी बसल्यावर एकमेकांसोबत गप्पा करताना ,आईबापासोबत घरी निवांत वेळेत ब-याच वेळा भुताच्या गोष्टी कुटुंबात चर्चेल्या जातात. लेकरंही सोबत बसलेली असतात. त्यावेळी त्यांच्या सुरु असणाऱ्या गप्पा मुलांना कल्पनेत घेऊन जातात. मुले अशावेळी बोलत नसतात फक्त ऎकत असतात. मनात चित्रांची रचना सुरु असतेच. त्यांच्यात अमुक्याची भांडणं ,तमुक्याला देव पावलाय, अमुक्याला भुताने झपाटलेय म्हणून त्याच्या घरी अमुक घडतयं तमुक घडतेय . अशा गप्पा सुरू असतात. त्यामुळे मुलांना अशा गोष्टी ख-याच वाटतात. पालकांनी कल्पनातील भितीच्या गोष्टी मुलांच्या अवश्य कानावर घालाव्यात पण त्यापासून लेकरु घाबरणार नाही ,त्याच्या मनात उमटलेली प्रतिमा आयुष्यभर राहणार नाही.  यासाठी मुलांच्या मनात शिरलेल्या भितीच्या कल्पनात्मक प्रतिमेचे निरसन वेळीच व्हायला हवे. भविष्यात अशी मुले भितीच्या वातावरणात जगतात. त्यांच्यात पुरेसा आत्मविश्वास आढळत नाहीत.
       कल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास निश्चितच होतो पण कल्पना कोणती करतोय त्यावरही बरेच अवलंबून असते. नेहमीच भूतांच्या गोष्टी मुलांना भितीच्या कल्पनेच्या घेऊन जातात. वेळीच निरसन झाले नाही तर अशी मुले घाबरट तयार होऊ शकतात.
मुलांना कल्पनेच्या दुनियेत रमायला खुप आवडते पण त्या कल्पना विद्यार्थी विकास करेल अशा असायला हव्यात.
कल्पनेतून अभिव्यक्ती,कल्पनेतून रचना,कल्पनेतून विचार स्वातंत्र्य अशा कित्येक बाबी घडवून आणता येतात.

कल्पनेच्या आनंदी ,दुखी,स्वच्छंदी, सृजनशील ,भितीच्या दुनियेत पालक व शिक्षकांनी जायलाच हवे. मुलांसोबत मनसोक्त गप्पा करायला हव्यात. मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत बरेच काही घडत असते . यातून मूल समजून घ्यायला मदत होते. मुलांच्या अनेक समस्यांना सोडवता येतात आणि विकासाच्यादृष्टीने पुढचे प्रयत्न सुरु करता येतात.

https://shikshanvichar.blogspot.com/2018/10/blog-post_31.html?m=1

धन्यवाद 🙏🏻

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...