*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या*
लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल.
लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे. अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत . त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत.
खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांना देऊ शकेल ; अगदी बिस्किटांपासून ते इतर खेळण्यापर्यंत .कारण हीच सवय मुलांमध्ये सामाजिक बांधलकीचे बीजारोपण करत असते.त्यातून सामाजिक बांधिलकी तयार होत असते. यासाठी आपण मुलांना समजून सांगायला हवे की देण्यातही आनंद असतो. आपण चाॅकलेटस् आणलं तर घरातील प्रत्येकाला एक एक देऊन मग खायला हवे असं मुलांना समजून सांगायला हवे.
शंभू त्याच्या अनेक खेळण्या मित्रांना शेअर करत असतो. चाॅकलेट वगैरे नेहमीच त्याच्या मित्रांना देत असतो. एकदा तर मी पाच चाॅकलेट आणल्या होत्या. त्याने मला तिथेच विचारले, "आप्पा इतक्या कुणाला घेतल्यात चाॅकलेट?" मी म्हणालो, "अरे तुलाच घेतल्यात" .
चाॅकलेटस् त्याच्या खिशात ठेवल्या. गाडी सुरु करुन आम्ही रुमच्या दिशेने जात होतो. "मी माझ्या फेन्डस् ला देणार आहे आणि मला एक ठेवणार आहे चाॅकलेट " शंभू बोलत होता. "ठीक आहे" मी उत्तरलो.रूमजवळ गाडी लावल्यानंतर त्याच्या मित्रांच्या घरी जाऊन चाॅकलेट देऊन आल्यावरच परत रूममध्ये आला आणि म्हणाला, "दिल्या मी चाॅकलेट."
अशा लहान लहान देण्याच्या प्रसंगामुळे मुलांमध्ये दुस-यांसाठी वेळ देणे, दुस-यांना मदत करणे अशा भावना वाढीस लागतात.त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार, लोकसंग्रह वाढण्यास मदत होत असते. लहानपणी स्वतः च्या वस्तू ,खाऊ देण्याची सवय त्याची पायाभरणी म्हणता येईल.
-ज्ञानदेव नवसरे,नाशिक

मस्तच माऊली
ReplyDeleteधन्यवाद कोळेकर सर
Deleteखुप छान .......
Deleteखूप छान , चार भिंतीबाहेर च जग दाखवून छान पालकत्व निभावताय तुम्ही

DeleteNice mauli
ReplyDeleteNice mauli
ReplyDelete