Skip to main content

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या*
लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल.
लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत.
खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांना देऊ शकेल ; अगदी बिस्किटांपासून ते इतर खेळण्यापर्यंत .कारण हीच सवय मुलांमध्ये सामाजिक बांधलकीचे बीजारोपण करत असते.त्यातून सामाजिक बांधिलकी तयार होत असते. यासाठी आपण मुलांना समजून सांगायला हवे की देण्यातही आनंद असतो. आपण चाॅकलेटस् आणलं तर घरातील प्रत्येकाला एक एक देऊन मग खायला हवे असं मुलांना समजून सांगायला हवे.
शंभू  त्याच्या अनेक खेळण्या मित्रांना शेअर करत असतो. चाॅकलेट वगैरे नेहमीच त्याच्या मित्रांना देत असतो. एकदा तर मी पाच चाॅकलेट आणल्या होत्या. त्याने मला तिथेच विचारले, "आप्पा इतक्या कुणाला घेतल्यात चाॅकलेट?" मी म्हणालो, "अरे तुलाच घेतल्यात" .
चाॅकलेटस् त्याच्या खिशात ठेवल्या. गाडी सुरु करुन आम्ही रुमच्या  दिशेने जात होतो. "मी माझ्या फेन्डस् ला देणार आहे आणि मला एक ठेवणार आहे चाॅकलेट " शंभू बोलत होता. "ठीक आहे" मी उत्तरलो.रूमजवळ गाडी लावल्यानंतर त्याच्या मित्रांच्या घरी जाऊन चाॅकलेट देऊन आल्यावरच परत रूममध्ये आला आणि म्हणाला, "दिल्या मी चाॅकलेट."
अशा लहान लहान देण्याच्या प्रसंगामुळे मुलांमध्ये दुस-यांसाठी वेळ देणे, दुस-यांना मदत करणे अशा भावना वाढीस लागतात.त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार, लोकसंग्रह वाढण्यास मदत होत असते. लहानपणी स्वतः च्या वस्तू ,खाऊ देण्याची   सवय त्याची पायाभरणी म्हणता येईल.

-ज्ञानदेव नवसरे,नाशिक

Comments

  1. Replies
    1. खूप छान , चार भिंतीबाहेर च जग दाखवून छान पालकत्व निभावताय तुम्ही

      Delete
    2. खूप छान , चार भिंतीबाहेर च जग दाखवून छान पालकत्व निभावताय तुम्ही

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...