Skip to main content

Posts

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर             - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव                 सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम.           शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत...

शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे.

#पालकत्व      ✍🏻 ज्ञानदेव नवसरे आज मेन्स पार्लरच्या दुकानात बसलेलो होतो .त्याठिकाणी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे दोन पालक शेजारीच बसले होते (विशेष म्हणजे ते मराठी शाळेचे शिक्षकच अाहेत) . आज सुट्टी असल्याने त्यांच्या लेकरांना पण घेऊन आले होते. त्यांच्या चर्चा चालु होत्या. आमच्या सोम्याची शाळा अमुक करुन घेतेय ,दुसरा सांगता होता आमच्या गोम्याची शाळा तमूक करून घेतेय. सहज मुलांना प्रश्नही केले जात होते.  पाठांतरावर आ्दारित अअसणाऱ्या प्रश्नांची मुले सहज उत्तरे देत होती. एकमेकांकडून एकमेकांच्या लेकरांना शाबासकी ददेण्याचे काम सुरु होते.  मी शांतपणे सर्व ऎकून घेत होतो. माझ्या मनात विचार आला की मुलांची अशी पोपटपंची म्हणजे शिक्षण असे पालकांना वाटतेय का?  खरोखरच याला शिक्षण म्हणावे का ? खरंतर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण मम्गणजे सुसंस्कार , शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती इतक्या व्यापक अर्थाने असणारा हा शब्द आज केवळ परिक्षा अन परीक्षेचे गुणदान यापुरता मर्यादित राहतोय का?  आणि त्याच दृष्टीने प्रयत्न म्हणजे केवळ परिक्षा तयारी च्या शिक्षण हे मुलांचा विकास त्यांच्या कल...

जबाबदारी विकासाची

#जबाबदारी_विकासाची व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित वर्तनबदल घडवून आणणारी ,सर्वांगीण विकास साधणारी स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजे शिक्षण ...शिक्षण प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते.  मुलांच्या अध्ययनास मदत करणाऱ्या या संस्थांवर असणारी जबाबदारी सर्वांनी समजून घेणे गरजेचे असते. विद्यार्थी विकासाची संपूर्ण जबाबदारी शाळाचीच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः च्या जबाबदारीतून काढता पाय घेणे . कुटुंबाने काढता पाय घेतला तर मुलांच्या अध्ययनाच्या आणि विकासाच्या गतीवर परिणाम घडून येतो. मूल हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे .समाजातील सकारात्मक व नकारात्मक वातावरणात वाढत असते. शाळा ,कुटुंब यांनी निरीक्षणातून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्नास मदत भेटत असते. शाळेतील अनेक गोष्टी मुलं कुटुंब आणि समाजाकडून शिकत असते याउलट समाजातील अनेक गोष्टी शाळा अन कुटुंबासोबत शिकत असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या पातळीवर विद्यार्थी विकासाचा राजमार्ग पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास मुलांचा सर्वांगीण विकास करणे सोपे जाते असे मला...

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..* www.Shikshanvichar.blogspot.in              अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते. जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते. मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो?  महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीड...

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡                      🖋 *ज्ञानदेव नवसरे*            www.Shikshanvichar.blogspot.in           मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.             अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.           अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री...

निर्णयांची कसरत

😇☺ 🙆🏻  *निर्णयांची कसरत ...* 🙆🏻‍♂😊😇           🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in              जया प्रथमच गाव सोडून बाहेर गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट   सीमासोबतच करायची.         पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.            आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला ख...

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*           🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव* @⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.          काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले . येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...

पालकत्वाच्या वाटा

👶🏻👴🏻👨🏻‍💻🤷🏻‍♀🙋🏼‍♀👨‍👨‍👧 *पालकत्वाच्या वाटा* - *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* आपण अापल्या मुलांना अधिक आनंदी ,संस्कारित,सदृढ व जीवनात यश मिळवण्यासाठी काय काय करु शकतो?याचा विचार प्रत्येक पालक करत असेलच असे नाही. बहुतेक पालकांना स्वतः च्या व लेकरांच्या पोटाची खळगी भरण्याचीच चिंता असते तिथे पाल्याचा मानसिक, भावनिक ,सामाजिक विकासाच्यादृष्टीने प्रयत्न दूरच असतो. माझा मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा, समाजाभिमुख व्हावा यासाठी अगोदर पालकाने तसे घ्यावे लागते.पालकत्व हा महत्त्वाचा विषय पण पुरेशा वेळेअभावी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. निसर्गतःच बालकाची वाढ होत असते. बालकांच्या स्वभावात वयानुसार काय बदल होतात?त्याच्या गरजा, अपेक्षा कोणत्या समजल्यानंतर बाल्याशी कशी वागावे यासाठी दिशा मिळते मग बालकाच्या गरजा ,अपेक्षा, समस्या कळायला नकोत का?  मुले कोणत्या वयात लाजतात?  कोणत्या वयाने 'नन्ना' चा पाढा गातात? हे अगोदरच पालकाला समजले तर मुलांशी जसे वागावे याबद्दल पालकांच्या मनात शंका उरत नाही. आपण लहान असताना आई- वडील, आजी -आजोबा ,इतर घरातील माणसांनी आपल्याला कसं वाढवलं हे आप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांन...

अनुभवलेली लोकं

*मी अनुभवलेली लोकं* 📝 *ज्ञानदेव नवसरे* #Status ला *@बालसेवा देशविकासासाठी* लिहितात आणि *बालकांसाठी झटणा-यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. # Status ला *@नाते_ऋणानुबंधाचे* लिहितात आणि *मैत्री करताना जात पाहतात* ही उलटदर्शी लोकं घातकच. #Statusला *समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानतात* आणि जो *समाजासाठी झगडतोय त्यांचा व्देष* करतात. ही उलटदर्शी लोकं घातकच. अशी *उलटदर्शी लोकं सुलटं काम करणारांनाच त्रास* देतात. #तात्पर्य  *माणसं जोडताना जात ,नातेसंबंध,फुकटची देशभक्ती नाही तर त्याचे इतरांसोबतचे नाते, त्याचे समाजासाठीचे काम आणि देशासाठीचे काम पहावे.* # *तुम्ही देशभक्त आहात  तुम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही.* धन्यवाद🙏🏻

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनान...

आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग

*#आत्मविश्वास हा बुद्धिमत्ता विकसनाचा राजमार्ग* जून महिन्याचे सुरुवातीचे शाळेचे दिवस होते. इयत्ता पहिलीत नव्याने मुले दाखल होत होते. शाळेचे वातावरण त्यांच्यासाठी अनोळखी होते. काही मुले सभाधीटपणे बोलत तर काही मुले लाजरीबुजरी आणि घाबरलेली असायची. तीन दिवस साईची आई त्याला घेऊन सुरूवातीला बसली तरीही साई शाळेत बसल्यावर रडत असायचा. काही दिवसानं माझ्यावर त्याचा विश्वास बसल्यावर रडायचा थांबला. साईबद्दल नंतर स्वतंत्र निश्चितपणे लिहिणार आहे. यश हा एकांगी राहणारा आणि अतिशय घाबरट होता. मी वर्गाच्या बाहेर गेलो की बँंचखाली लपून बसायचा. मी विचारायचो,  "यश कुठे गेला?" मुले सांगायची, "बँंचखाली लपलाय" . मी जवळ जाऊन त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तर रडायचा म्हणून मी त्याला जास्त बळजबरी कधीही केली नाही. तो तसाच बँचखाली लपून बसायचा.  चाॅकलेट आणल्यात ,मोबाईलवर कार्टुनस् लावल्यात म्हटल्यावर हळूच वर बसायचा तरी माझ्या जवळ यायचा नाही. एके दिवशी दोनच मुले पहिलीची आली होती. दोघंजण एका रॅम्पवर घसरगुंडी करत होते.मी दोघांच्या जवळ गेलो .मोबाईलवर कार्टुनस् लावल्या. शाळेचे सुरुवातीचे चार पाच दि...

मुलांना समजून घेताना घाई कशाला?

# *मुलांना समजून घेताना घाई कशाला?* रविवारचा दिवस होता. माझा Laptop ची बॅटरी प्रोबलेम आणि इतर updated software घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या लॅपीचे काम होईपर्यंत मी खुर्चीत बसलेलो होतो. तिथे आलेल्या काही जणांसोबत शिक्षण ,विद्यार्थी ,शाळा यावर गप्पा सुरु होत्या. त्यातील एक प्रसंग लिहावा वाटला.  एकजण बोलत होते माझ्या वर्गातील काही मुले अजिबात बोलत नाहीत.एकदम शांत बसून घेतात.आपण पन्नास वाक्य बोलावी तेव्हा ते एक वाक्य बोलतात बाकी ढिम्म बघत बसतात. ते विद्यार्थी बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव कसा कळेल? त्याच्या मनात काय चाललेय, हे कसं कळेल?आणि मला कळल्याशिवाय मी त्यांना काय सांगू?  ते एकदम शांत बसतात म्हणजे ते ढिम्म आहेत ,म्हणजे ते ढ आहे त्यांची बुद्दीची चालत नाही असे त्यांचे मत येत होते.  खरतर वास्तवात तसे नसतेही. कारण स्वभाव आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजलं जातं . अनेकदा आपण तक्रार करत असतो की अमुक्याचा स्वभाव असा आहे ,त्याला मी काय करणार?  त्याची बुद्धिमत्ता कमी आहे त्याला मी काय करणार.परंतु स्वभाव आणि बुद्धिमत्ता यांना जोडणारी गोष्ट म्हणजे त...

उत्साहाचे वातावरण आणि आपण

*#उत्साहाचे वातावरण आणि आपण* सध्या आजूबाजूला पाहिले तर अनेक मुले, शिक्षक,पालक यांच्यात एक तक्रार नेहमी आढळताना दिसते की 'मला बोअर होतेय , मला कंटाळा आलाय ,मी करणार नाही'.   या उत्साहाच्या बाबतीत घडलेला मला एक प्रसंग आठवतोय.गेल्या आठवड्यात नवरात्रानिमित्त येवल्यात नऊ दिवस कोटमगावच्या देवीची मोठी यात्रा असते त्या दरम्यान एका दिवशी विद्यार्थी उपस्थिती  ब-यापैकी कमी होती. मुख्याध्यापक सर आणि मी विद्यार्थ्यांच्यासोबत जेवण करत होतो. आमच्या जेवताना गप्पा सुरु असतात.  एका सहावीचा मुलगा म्हणाला,"आज मला लयी बोअर होतेय" . मी म्हणालो, "बोअर होणे म्हणजे काय?" "अहो सर, म्हणजे मला करमत नाही,खेळू वाटत नाही,अभ्यास करु वाटत नाही" . जवळचे  घडवणारे, खेळवणारे आणि मदत करणारे त्याचे  मित्र आज शाळेत आले नव्हते त्यामुळे त्याला तसे वाटत होते.  खरतर मुलांची उपस्थिती हवी तितकी नसेल तर केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांमधील उत्साह पण मावळतो .डोके चक्रावल्यासारखे होते. मुलांच्यामध्ये उत्साह नसेल तर शिक्षकांमध्ये त्यांना शिकवायला ,त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडून उपक्र...

भूमिका बदलाचा खेळ

*# भूमिका बदलाचा खेळ* संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा थोपण्याआधी शंभूबाळासोबत अर्धा-एक तास खेळ चालू असतोच. ब्लाॅक्स,चित्रांचा खेळ ,गाड्या वगैरे खेळणीसोबत खेळ तर चालूच असतात.  शंभू चा प्रतिसाद घेण्यासाठी भूमिका बदलाचा खेळ हा माझा त्याच्यासोबतचा आवडता खेळ आलेला आहे.  यामध्ये शंभु अनेक भूमिका घेत असतो. कधी भेळवाला ,कधी भाजीवाला ,कधी डाॅक्टर तर कधी माझी आई होत असतो. शंभुची माझ्या आईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी  आनंदाचा तितकाच मजेचा खेळ असतो. मला पुन्हा लहानपण जगता येते.यामुळे मला फायदाही होत असतो. आईच्या किंवा इतर भूमिकेत बाळ जेव्हा बोलत असते तेव्हा त्याचीच विचारशैली विकसित होत असते.गमतीत खेळत असलेला खेळ माझ्या अनेक समस्यांना उत्तर देत असतो. खरतर संस्कार घडताना अशा गमतीदार मार्गांचा उपयोग फायद्याचा ठरतो कारण अशा प्रसंगातून संस्कार घडले जातात ते लादले जात नाहीत.आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी चांगलं वागावं. एका अंगाने विचार न करता वेगळा विचार करावा .  यासाठी अापल्याही यातून जावे लागते . म्हणून याला मुलांचा संस्कार विकास, बुद्धीचा विकास म्हणजे पालकाचा विकास असे...